Railway Track
अजय ला आज खूपच उशीर झाला होता .. काय करणार वर्क लोड इतकं आणि त्यात मार्च एन्ड उशीर तर होणारच ... त्यात त्याच घर सुद्धा स्टेशन पासून बरच लांब होतं , म्हणजे स्टेशन वर उतरला कि त्याला पुन्हा रेल्वे ट्रॅक वरूनच जावं लागायचं ... दोन स्टेशन च्या मध्ये त्याच घर होत इकडून गेलं काय अन तेकडून गेलं काय सगळं सेमच
त्याला तसं ते सवयीचं झालं होत पण आज घड्याळात रात्रेचे १ वाजले होते ... रात्रीच्या मिट्ट काळोखात तो रेल्वे ट्रॅक च्या कडेने चालत होता ... अंधारात मोबाईलच्या टॉर्च चा आधार घेत तो एक एक पाऊल पुढे टाकत होता ,,, थंडगार वारा सुटला होता .. पण जणूकाही वाऱ्याचा स्पर्श आपल्या शरीराला होतच नाहीय असं त्याला जाणवत होतं इतक्या थंडीत सुद्धा त्याला घाम फुटत होता ... मनात अनामिक भीती त्याला जाणवत होती ... त्याला आसपास कोणीच दिसत नव्हते ,, सगळीकडे काळोख आणि त्या काळोखात फक्त तो आणि त्याच्या मोबाइल ची टॉर्च ... बस.... एक आवाज आणि त्याच्या काळजात धस्स झालं .. त्याला मागून आवाज आला ... इतक्या रात्री हा आवाज त्याला अपेक्षित नव्हता ... तो त्या विचारातून सावरतो तितक्यात पुन्हा त्याला आवाज आला आता मात्र तो चांगलाच घाबरला होता .. तसा तो आवाज जवळ येऊ लागला ... तो आवाज एका बाई चा होता "अहो ऐका ना "... लाल रंगाची साडी हातात लाल बांगड्या तिचे काळेभोर केस चेहऱ्यावर पसरलेले ती हळू हळू त्याच्या जवळ येत होती ... तो जागेवरून हालत सुद्धा नव्हता जणू काही त्याच्या शरीरात जीवच नाही ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली .. तिला बघताच त्याचे शरीर भीतीने थरथरायला लागले .. त्याने बघितलं तिचे डोळे ... डोळे नव्हतेच खोबण्या होत्या फक्त आणि तिचा पंधरा फाटक चेहरा ,, एक क्रूर हास्य करत तिने त्याच्याडे पाहिलं आणि म्हणाली ,,, चल माझ्यासोबत एक गम्मत आहे तुझ्यासाठी तो मात्र एखाद्या आज्ञाधारी नोकरासारखा मालकाने दिलेलं काम करत होता अर्थात तो तिच्या इशाऱ्यावर चालू लागला बघता बघता तिने त्याला रेल्वे ट्रॅक च्या मधोमध आणून उभे केले आणि म्हणाली इथेच थांबायचं ... कुठेच जायचं नाही .. मग मी कायमची तुझी होईन .. त्याने होकारार्थी मान डोलावली .. क्षणार्धात लांबून ट्रेन येण्याचा आवाज येत होता ... ट्रेन त्याच्या शरीराची लख्तरं पाडून निघून गेली ... दुसऱ्या क्षणात तो तिच्या हातात हात घालून उभा होता आपल्या शरीराचे चिंधडे बघत ,,, एक नजर स्वतःच्या प्रेताकडे आणि एक नजर तिच्याकडे .. तो म्हणाला आता पुढे काय ? ती म्हणाली काही नाही आता आपण खूप गप्पा मारू ... अन हसतच ते दोघे त्याच रेल्वे ट्रॅक वरून चालू लागले
Khupach bhayanak story hoti.
ReplyDeleteThank you
Delete