पडकी शाळा

 

                                                पडकी शाळा

 

हा अनुभव आहे माझी मैत्रीण रेश्माचा .. फोन वाजत होता तिचा ..

आईचा होता .. तिने उचलला

हमम बोल   आई

आई : कुठे पोचलीस ?

रेश्मा : अगं अजून नालासोपारालाच पोचले आहे आता पोचेन  मिनिटात विरार ला

आई : जावई येणार आहेत ना घ्यायला ?

रेश्मा : नाही ते आज कामात आहेत तर त्यांना यायला जमणार नाही , मी जाईन शेयर ऑटो ने

 

आई : बरं , पण ऑटो नेच जा , चालत जाऊ नकोस , तुमचं नवीन घर हे स्टेशन पासून लांब आहे हे माहितीय ना तुला तेव्हा नीट जा मी ठेवते

 

आई सोबत बोलता बोलता विरार आलं , घरी जाण्यासाठी ती शेयर ऑटो स्टॅन्ड वर आली , आज तिला स्टॅन्ड वर खूपच गर्दी दिसत होती .. दिवसभराचं काम आणि प्रवास यामुळे ती खूप दमली होती आणि कधी एकदा घरी पोचते असे तिला वाटत होती पण गर्दी कमीच होत नव्हती आणि रिक्षा सुद्धा खुप उशिराने येत होत्या शेवटी तिने चालत जायचेच ठरवले ....

दमल्यामुळे तिने शॉर्टकट ने जायचे ठरवले , शॉर्टकट थोडासा निर्जन होता ...म्हणून तिने पटकन बॅगेतून हेडफोन्स काढले आणि गाणी ऐकण्यास सुरुवात केली .. या आधी तिने या रस्त्यावरून यायचे ठरवले नाही पण आज नाईलाज होता ,,

वाटेवरून जाताना तिला पडक्या शाळेला ओलांडून जावे लागणार होते .. एव्हाना आजूबाजूची चार भुंकणारी कुत्री सुद्धा दिसेनाशी झाली होती , हवेत एक विचित्र प्रकारचा गारवा जाणवत होता ... आता रेश्माचा गाणी ऐकण्याचा interest गेला होता .. ती झपाझप पावले टाकत चालत होती , इतक्यात तिच्या काळजाचा ठोका चुकला .. इतक्या गारव्यात सुद्धा तिच्या कपाळावर घामाचे थेंब तरंगत होते ... तिने पहिले, पडक्या शाळेच्या बोर्डावर एक बाई पांढऱ्या रंगाच्या साडीत फळ्याच्या दिशेकडे तोंड करून काहीतरी लिहीत होती , ती नक्की कोण आहे आणि तेथे काई करते आहे हे पाहण्यासाठी रेश्मा थोडी पुढे गेली .. पण समोरचे ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच नाही तर त्या खालचं पाताळसुद्धा हादरलं ... त्या फळ्यावर लिहिले होते .. " चूक केलीस ... आता मरणार आहेस तू  रेश्मा " पळण्याची इच्छा नसून सुद्धा पायात त्राण नव्हते .. सगळं धीर एकवटून तिने पळण्याचा प्रयत्न केला .. ती पळत असताना तिला त्या बाईच्या जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू येत होता .. तो आवाज भयानक आणि जीवघेणा होता  ... ती अगदी जिवाच्या आकांताने पळत होती ... तेवढ्यात तिच्या कानाजवळ एक आवाज आला ती बाई तिचे नाव घेऊन तिला बोलावत होती ... रेश्मा ... रेश्मा ... ती मनातल्या मनात देवाचा धावा करू लागली ...

तिचे डोके बधिर झाले होते जीव वाचवण्यासाठी ती फक्त पळत होती .. अचानक तो आवाज यायचा बंद झाला ... तशी ती थांबली आणि बघितले कि ती त्या पडक्या शाळेच्या बाहेर आnली आहे ... मागे बघण्याचं धाडस तिच्यात नव्हतं ... फक्त एकच आवाज तिला ऐकू आला " वाचलीस आज" ती घरी गेली तेव्हा तिने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला तेव्हा तिच्या सासूने तिला सांगितले कि ती शाळा बंद होण्याचे कारण हे ती बाई आहे .. लोकं म्हणतात ती याच शाळेत शिकवण्यासाठी होती , अन एक दिवस तिने तेथेच आत्महत्या केली ... तेव्हापासून मग त्यात शाळेत खूप विचित्र प्रसंग घडायला लागले अन ती शाळा बंद करण्यात आली ... काही लोकांना ती बाई जशी तुला दिसली तशीच त्यांना सुद्धा दिसली आहे .. दुसऱ्या दिवशी रेश्माला ताप भरला ... आजही ती तो प्रसंग विसरू शकली नाही

 

Comments