Railway Track
अजय ला आज खूपच उशीर झाला होता .. काय करणार वर्क लोड इतकं आणि त्यात मार्च एन्ड उशीर तर होणारच ... त्यात त्याच घर सुद्धा स्टेशन पासून बरच लांब होतं , म्हणजे स्टेशन वर उतरला कि त्याला पुन्हा रेल्वे ट्रॅक वरूनच जावं लागायचं ... दोन स्टेशन च्या मध्ये त्याच घर होत इकडून गेलं काय अन तेकडून गेलं काय सगळं सेमच त्याला तसं ते सवयीचं झालं होत पण आज घड्याळात रात्रेचे १ वाजले होते ... रात्रीच्या मिट्ट काळोखात तो रेल्वे ट्रॅक च्या कडेने चालत होता ... अंधारात मोबाईलच्या टॉर्च चा आधार घेत तो एक एक पाऊल पुढे टाकत होता ,,, थंडगार वारा सुटला होता .. पण जणूकाही वाऱ्याचा स्पर्श आपल्या शरीराला होतच नाहीय असं त्याला जाणवत होतं इतक्या थंडीत सुद्धा त्याला घाम फुटत होता ... मनात अनामिक भीती त्याला जाणवत होती ... त्याला आसपास कोणीच दिसत नव्हते ,, सगळीकडे काळोख आणि त्या काळोखात फक्त तो आणि त्याच्या मोबाइल ची टॉर्च ... बस .... एक आवाज आणि त्या...